Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चीनी लष्कारांकडून शक्तीप्रदर्शन

chin

नवी दिल्ली प्रतिनिधी । चीन कम्युनिस्ट शासनाची मंगळवारी ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने एक भव्य सैन्य परेड आयोजित केली होती. यात क्षेपणास्त्र, सुपरसॉनिक ड्रोन आणि जगातील सर्वात लांब पल्ल्याचे बॅलास्टिक मिसाईल चीनने या प्रदर्शनादरम्यान सादर केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चीनलगतच्या सीमेवर महिनाभर ‘हिम विजय’ अभियान चालवलं जात आहे. यात नव्या १७ व्या ब्रह्मास्त्र कॉर्प्सचे रुपांतर एका उत्कृष्ट तुकडीत करण्यात येणार आहे. एकून तीन आयबीजी बनवल्या जाणार आहेत. प्रत्येकात ५ हजार जवान, अनेक रणगाडे, एअर डिफेन्स युनिट, सिग्नल आणि अन्य उपकरणे सामील आहेत. या आयएएफ सी-१७ ग्लोबमास्टर-३, सी-१३० जे सुपर हर्क्युलस आणि एएन-३२ एअरक्राफ्टसह अभ्यास करण्यात येणार आहे. यात जवानांना एअर लिफ्ट करून हेलिकॉप्टर्स आणि अन्य उपकरणांनाही समाविष्ट केले जाणार आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग जेव्हा या महिन्याच्या अखेरीस भारत दौरा करणार आहेत. तेव्हा हे ‘हिम विजय’ अभियान जोरात सुरू असेल. यापूर्वी पाकिस्तानला नजरेसमोर ठेवून बनवलेल्या आयबीजीने एप्रिल-मे मध्ये पश्चिमेला चंडीमंदिरात अभ्यास केला. १७ व्या कॉर्प्समध्ये जड वस्तू वाहून नेणारे एम-७७७ अल्ट्रा लाइट होवित्झर तोफांनादेखील चीनच्या आसपासच्या फॉरवर्ड आणि उंचीवरील जागेवर नेऊन ठेवू शकेल. वायू सेनेने सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या ८,०४८ कोटी रुपयांच्या डीलनुसार १५ सीएच-४७ एफ चिनुक हेलिकॉप्टर्स आपल्या ताफ्यात समाविष्ट केले. लष्कर नोव्हेंबर २०१६ मध्ये अमेरिकेसोबत पाच हजार कोटी रुपयांचा करार झाल्यानंतर १४५ एम-७७७ हॉवित्झर आपल्या ताफ्यात समाविष्ट करत आहे.

Exit mobile version