Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘लोकशाही दिन’ ऑनलाईन होणार

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, दि. ६ जून रोजी लोकशाही दिनाचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  “जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.

त्यानुसार सोमवार, दि. ६ जून रोजी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आलेला आहे.

“या लोकशाही दिनी ज्या नागरिकांना अर्ज करावयाचा असेल त्यांनी आपला अर्ज “lokshahi din jalgaon@gmail.com ”  या ई-मेल आयडीवर पाठवावा. सार्वजनिक स्वरुपाचे अर्ज सादर केल्यास ते प्रशासकीय अर्ज म्हणून ग्राहय धरण्यात येऊन लोकशाही दिनांत स्विकारले जाणार नाहीत. त्याचप्रमाणे  तसेच अर्जामध्ये Whatsapp no. नमुद करावे. जेणेकरुन सदर लोकशाही दिनाची link व passward  अर्जदारास उपलब्ध करुन दिला जाईल.”

असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

Exit mobile version