Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नंदुरबार किंवा भुसावळ येथून पुण्यासाठी रेल्वे सुरु करण्याची मागणी

railway meeting 1

धरणगाव, प्रतिनिधी | मुंबईतील चर्चगेट येथे नुकत्याच (दि.३०) रोजी घेण्यात आलेल्या रेल्वे विभागीय सल्लागार समितीच्या बैठकीत धरणगाव, अमळनेर व नंदुरबार येथील सदस्यांनी नंदुरबार पुणे एक्सप्रेस अथवा भुसावल-पुणे एक्सप्रेस व्हाया धरणगांव, अमळनेर, नंदुरबारमार्गे सुरु करावी. अशी मागणी लावून धरली. त्यावर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

 

या बैठकीला डी.जी.एम. परिक्षीत‌ मोहनपूरीया, सी.ओ.एम. शेलेंद्र कुमार, सी.सी.एम, राजकुमार लाल हे पदाधिकारी तसेच धरणगावचे झोनल सदस्य महेंद्र कोठारी, अमळनेरचे झोनल सदस्य बजरंग अग्रवाल व नंदुरबारचे झोनल सद्स्य मोहन खानवाणी व धिरज कोठारी हे उपस्थित होते.

तसेच डी.आर.एम. सत्या कुमार यांची भेट घेउन त्यांनी धरणगांव, अमळनेर व नंदुरबारसाठी २५,२५ बेंचेस मंजूर करून घेतले. धरणगावसाठी प्लॅटफॉर्म नंबर २ साठी कव्हर शेड मंजूर करुन घेतले. वॉटर वेंडिंग मशीनसाठीही मागणी केली. गेट नंबर १४९ व गेट नं.१३०, १३१ साठी बोगदा मंजूर करुन घेतला, तसेच धरणगावसाठी एटीएमही मंजूर करून घेतले.

Exit mobile version