Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय रद्द करण्याची मागणी

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाने किराणा दुकान, सुपर मार्केट व मॉलमधून “वाइन”  विक्रीचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय महाराष्ट्र सरकारने तातडीने रद्द करावा, अशी मागणीचे निवेदन समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जळगाव जिल्हा यांच्यातर्फे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.

सदरचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांना दिले आहे या निवेदनामध्ये नवीन युवा पिढी,सामान्य जनता व्यसनाधीन होण्याचे वाढते प्रमाण झाल्या शिवाय राहणार नाही त्यामुळे हा निर्णय अतिशय चुकीचा आहे त्यामुळे राज्य शासनाने रद्द करावा अन्यथा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जळगाव जिल्ह्याच्या वतीने तालुका आणि जिल्हा स्तरावर विविध प्रकारचे आंदोलन छेडण्यात जाईल असा इशारा सुद्धा या वेळी देण्यात आला.

निवेदन देताना कोरोना नियम पाळून जळगाव जिल्हा अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष,सदस्य उपस्थित होते,वाईन दारू सुपर मार्केट मॉल मध्ये विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने राज्यात 90 टक्के स्री-पुरुष,तरुण मुलं-मुली,विद्यार्थी,विद्यार्थिनी समाज सेवक पुरुष व महिला मंडळ,बचत गटातील महिला सदस्यांमधून राज्य सरकार यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.राज्य सरकारने हा निर्णय तात्काळ रद्द न केल्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणास आणि आंदोलनात सर्व स्तरातून पाठिंबा दिला जाणार असल्याची बोलले जात आहे.

 

 

 

Exit mobile version