Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घर बांधण्यासाठी दोन लाखांची मागणी; विवाहितेचा छळ

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील माहेर असलेल्या विवाहितेचा दोन लाखासाठी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पतीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील किनगाव येथील सखीनानाज शेख सद्दाम यांचा विवाह शेख सद्दाम शेख शब्बीर यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला आहे. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेला माहेरहून २ लाख रूपये घर बांधण्यासाठी आणावे अशी मागणी पती शेख सद्दाम शेख शब्बीर याने केली. पैसे दिले नाही म्हणून विवाहितेला मारहाण करून माहेरी सोडून गेले. शिवाय विवाहितेच्या आईवडीलांना शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. विवाहितेने याप्रकरणी पती शेख सद्दाम शेख शब्बीर, सासरे शेख शब्बीर शेख ईस्माईल, सासु सुलतानबी शेख शब्बीर, दिर शेख आरीफ शेख शब्बीर, शेख सुलतान शेख शब्बीर, नणंद फरजानाबी शेख फिरोज आणि नंदोई शेख फिरोज सर्व रा. किनगाव ता. यावल यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ असलम खान करीत आहे.

 

Exit mobile version