Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नणंदच्या शिक्षणासाठी विवाहितेकडून पैश्यांची मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विवाहितेला कोणत्या कारणावरून पैशांची मागणी केली जाईल याचा काहीच अंदाज नसतो. असाचा एक प्रकार जळगावात माहेरवाशिनीवर आला आहे. तिच्या नणंदच्या शिक्षणासाठी विवाहितेकडून पैशांची मागली केलीय. याबाबत पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर असे की, जळगाव शहरातील रामदास कॉलनी येथील प्रियंका प्रतिक पाटील यांचे माहेर आहे. काही वर्षांपूर्वी त्यांचा मानससरोवर ठाणे येथील प्रतिक सुभाष पाटील यांच्याशी झाला आहे. लग्नानंतर काही दिवसानंतर म्हणजेच ११ मे २०१३ ते जानेवारी २०१७ या काळात प्रियंकाने तिच्या नणंदच्या शिक्षणसाठी पैसे द्यावेत अशी मागणी पतीसह सासरच्यांनी केली. या कारणावरुन प्रियंका हिस शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण करत शारिरीक व मानसिक छळ केला. छळ असह्य झाल्याने प्रियंका माहेरी जळगावात निघून आल्या. व मंगळवारी छळाबाबत रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन प्रियंका तिचे पती प्रतिक पाटील, सासू आशा सुभाष पाटील, सासरे सुभाष गणपत पाटील, नणंत प्रतिक्षा सुभाष पाटील सर्व रा. मानससरोवर, ठाणे या चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक हे करीत आहेत.

Exit mobile version