रेमडीसीवर इंजेक्शनचे लुटमार थांबविण्यासाठी हिरकणी मंडळाची मागणी

चाळीसगाव, प्रतिनिधी :- चाळीसगावात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. त्यात रेमडीसीवर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक ठिकाणी मोठ्या दराने विक्री होत आहे. त्यामुळे यावर निर्बंध घालून मुबलक प्रमाणात इंजेक्शनसाठा उपलब्ध व्हावा, अशी मागणी हिरकणी महिला मंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशा धैमान घातले आहे. त्यात कोरोनावरील प्रभावी ठरलेल्या रेमडीसीवर इंजेक्शनचा तुटवडा आहे. या गोष्टींचा फायदा घेत तालुक्यात रेमडीसीवर इंजेक्शन सर्रास अवाजवीच्या स्वरूपात विक्री होत आहे. त्यामुळे हे काळाबाजार थांबविण्यासाठी स्व. लोकनायक तात्यासाहेब महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान संचालित हिरकणी महिला मंडळाने तहसीलदार अमोल मोरे व सहा. पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनात नमूद प्रमाणे सुरू असलेला ह्या काळाबाजाराकडे प्रशासन डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने हा विषय गांभीर्याने लक्षात घेऊन यावर आळा घालावा व चाळीसगाव तालुक्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात रेमडीसीवर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सध्या कोविड १९ संसर्गाने अनेक जण संक्रमित होऊन आपले जीव गमावत आहे. घरातील कमावता पुरुषच गेल्याने अनेक कुटुंबावर संकट ओढावले आहे. त्यामुळे या इंजेक्शनमुळे रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्काळ प्रशासनाने त्यांच्या स्तरावर प्रयत्न करायला हवेत असे आवाहन हिरकणी महिला मंडळाने केला आहे. यावेळी नगरसेविका तसेच पाणी चळवळीतल आद्य कार्यकर्त्या सविता राजपूत व हिरकणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुचित्रा राजपूत उपस्थित होत्या.

Protected Content