Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वरणगाव तालुका करण्याची मागणी; विभागीय आयुक्तांना निवेदन

वरणगाव प्रतिनिधी । वरणगाव हे इंग्रज काळात तालुका दर्जाचे शहर होते. शहराला एकुण ३२ खेडगाव जोडले गेले आहे. त्यामुळे वरणगाव तालुक्यातील स्वतंत्र निर्मीती करा अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनिल काळे यांनी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन देवून केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावेळी विभागीय आयुक्तांना भौगोलिक परिस्थितीचा विचार करता वरणगावला साध्या32 खेडे लागू आहेत.  हतनूर धरण, दिपनगर येथे विजनिर्मित्ती केंद्र, आयुध निर्माणी केंद्र, रेल्वे स्टेशन ग्रामीण रुग्णालय, नगरपरिषद असलेले शहर आहे.  तसेच शासकीय कामासाठी २० किलोमीटर भुसावळला जावे लागते. जेष्ठ नगरिकांना भुसावळला जाणे येणे शक्य नाही, शिवाय वरणगाव परिसराची लोकसंख्या २ लाखांहून अधिक आहे. तालुका निर्मितीसाठी वरणगाव हे बसते अश्या प्रकारची महत्वपूर्ण माहिती माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांना सांगितली. यावेळी भाजपाचे रमेश पालवे, किरण धुंदे, जिल्हा उपाअध्यक्ष मिलिंद भैसे, गोलू बोदडे, सागर वंजारी उपस्थित होते.

Exit mobile version