Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कामगारांना लसी प्राधान्याने देण्याची मागणी

यावल प्रतिनिधी । कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी सरकार देशभरात युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबवित आहे. 15 जानेवारीपासून कोरोना-प्रतिबंधित आणीबाणी लसीकरण सुरू आहे. यात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कामगारांना लसी देण्याची अपेक्षा आहे. अशा मागणीचे निवेदन यावलचे नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्यासह डॉक्टर मंडळीने प्रांत अधिकारी कैलास कडलग यांना दिले आहे. 

दरम्यान या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, २० फेब्रुवारी पर्यंत डॉक्टर आणी आरोग्य कर्मचारी यांचे नांव येणे अपेक्षीत होते सदरची तारीख उलटुन सुद्धा लसीकरणाच्या यादीत नाव आलेले नसल्याने यावल व रावेर तालुक्यातील अनेक डॉक्टर , आरोग्य कर्मचारी , रुग्णवाहीका चालक हे अद्याप लसीकरणापासुन वंचीत आहेत. अनेक लोकांनी प्राधान्यक्रमांक चुकवुन लसीकरण घेतल्याचे दिसत आहे. ज्यांचे समाजात कवडीचं ही योग्यदान नाही असे अनेक लोक फेसबुक वर लसीकरण करत असतांना चे फोटो टाकतात तेव्हा आमच्या अंतःकरणाला वाईट वाटत कारण कोरोनाच्या काळात संकट काळात रूग्णांसमोर सर्वात आदी सामोरेआम्ही जातो आता अशा प्रसंगी आम्हास डावलुन लसीकरण करणे योग्य नाही प्रशासनास आणी अधिकाऱ्यांना वेळी वेळी सहकार्य करून सुद्धा प्रशासन आमच्या बाबतीत गांभीर्य देवुन नाही याची आम्हास खेद वाटतो तरी आपण आपल्या पातळीवर या विषयाची चौकशी करून आम्हास न्याय मिळुन द्याल अशी अपेक्षाकृत मागणी  प्रांत अधिकारी कैलास कडलग यांना दिलेल्या निवेदनाव्दारे डॉ. कुंदन फेगडे, डॉ. विकास पाटील, डॉ. राजेश चौधरी, डॉ . प्रशांत जावळे यांनी केली आहे.

Exit mobile version