Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळा बलात्कार प्रकरणातील नराधामांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी

भुसावळ प्रतिनिधी । पारोळा बलात्कार प्रकरणातील नराधामांवर कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था, भुसावळतर्फे जिल्हाधिकारी आभिजीत राऊत यांना आज निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटल्यानुसार, पिडीतेवर सामुहिक अत्याचार करणाऱ्या नराधामांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, यापुढे महिलांवर अत्याचार होणार नाही. यासाठी शासनाने कठोर कार्यवाही करणे आवश्यक आहे. सबंधीतांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था, भुसावळतर्फे जिल्हाधिकारी आभिजीत राऊत यांना आज निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. यावेळी अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जयश्री इंगळे, उपाध्यक्ष वंदना जोगदंड, सचिव शिला लहाने आणि इतर महिला यावेळी उपस्थिती होत्या.

Exit mobile version