Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा पोलीस वसाहतीमधील वाहने हटविण्याची मागणी

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या आवारात उभी असलेली अवजड वाहने व ट्रॅक्टर तातडीने हटविण्याची मागणी पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे आज उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

याप्रसंगी असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष हर्षल पाटील, पाचोरा ग्रामीण तालुका अध्यक्ष नदीम शकील शेख, मंगलसिंग राजपुत, जिल्हा मार्गदर्शक डॉ. अतुल पाटील, जिल्हा सचिव प्रफुल्ल पाटील, विधीविषयक सल्लागार उमेश राठोड, उपतालुका अध्यक्ष करण पाटील, कार्याध्यक्ष बंटी पाटील, संपर्क प्रमुख मोईन शेख, तालुका विधीविषयक सल्लागार अॅड. प्रशांत भावसार, प्रसिद्धी प्रमुख बंडु सोनार, तालुका सचिव गौरव चौधरी, आशा पाटील, सुरेखा महाजन, पुनम निकम, वैशाली मराठे, प्रतिभा नरवाडे, सुनंदा पाटील, भाग्यश्री नाईक, पुनम पाटील, मंगला पाटील, प्रियंका राजपुत उपस्थित होते. सदरील वाहने तात्काळ न हलविल्यास सदनशिलमार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे.

 

Exit mobile version