मांडकी खुर्द येथील अतिक्रमण काढण्याची मागणी

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील मांडकी खुर्द परिसरात विविध ठिकाणी नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण तातडीने हटविण्यासाठी एकलव्य संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम यांना निवेदन दिले

तालुक्यातील मांडकी खुर्द हे गाव गेल्या १० ते १२ वर्षांपासून पुनर्वसनासाठी प्रस्तावित आहे,त्यासाठी गृप ग्रामपंचायत असलेल्या पुनगांव शिवारातील गट क्रं. १२ मधे गावठाण निश्चित केलेले असून या जागेवर १२ ते १५ लोकांना ग्रामपंचायतीने शासकीय घरकुल योजनेचा लाभ दिला आहे. उर्वरित जागा पुनर्वसनासाठी असल्याने या जागेवर गावातील सदन नागरिकांनी शेड, गोठे, खळे तयार करून अतिक्रमण केले आहे.

सदर जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना एकलव्य संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ यांचे नेतृत्वाखाली आदिवासी भिल्ल जमातीच्या ५५ नागरिकांनी सह्यांचे निवेदन दिले. पुनर्वसन झालेल्या जागेवरील अतिक्रमण तातडीने न काढल्यास एकलव्य भिल्ल संघटनेमार्फत मोर्चा काढणार असल्याचा उल्लेख केला आहे.

मांडकी खुर्द  गावात सुमारे ९० टक्के आदिवासी भिल्ल समाजाचे वास्तव्य असून या जागेवर गावातील अनेक नागरिक अतिक्रमण करून सदरची जागा बळकवीत आहेत. त्यांना विचारण्यासाठी गेल्यानंतर ते मारण्याच्या धमक्या देतात. तरी शासनाने सदर जागेवरील अतिक्रमण निर्मूलन करुन त्या जागेचे मोजमाप करुन या जागेवर घरे बांधून द्यावीत व आदिवासी भिल्ल समाजाला न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन करण्यात आले.

निवेदनावर देवराज वाघ, शिवनाथ मालचे, गणेश वाघ, नामदेव भिल, अनिल मालचे, राजू मोरे, सुनील भिल, हिलाल भिल, सचिन भिल, रेखा भिल, जुलाल भिल, प्रभाकर मिलचे, लता भिल, अलका भिल, सरुबाई मालचे, अरुणा भिल, कालूसींग भील, मंगला भील, अशोक भिल, पप्पू मोरे, सुनिता भील, छाया भील, अशोक सोनवणे, सुनील मालचे सह ५६ नागरीकांच्या सह्या व आंगठे असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार पाचोरा, पोलीस निरीक्षक पाचोरा व आमदार किशोर पाटील यांना देण्यात आल्या आहेत.

 

Protected Content