Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवजयंतीनिमित्त संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची रंगरंगोटी करण्याची मागणी

खामगाव- लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील शिवाजीनगर भागातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या रंगरंगोटीबरोबरच दरवर्षीप्रमाणे संपूर्ण स्टेडियमची रंगरंगोटी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

याबाबत आज  मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून सदर निवेदनात नमूद आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी येथील शिवाजी नगर भागातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, सभागृह, छत्रपती शिवाजी महाराजांचा  पुतळा, राजमाता जिजाऊ मा साहेब यांची प्रतिमा यासह संपूर्ण स्टेडियमची रंगरंगोटी करण्यात येत असते. तसा कायमस्वरूपी ठराव नगरपरिषदेने घेतलेला आहे. परंतु यावर्षी खामगाव नगर परिषदच्या वतीने याबाबत काढण्यात आलेल्या निविदेमध्ये केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रंगरंगोटी करण्याचाच उल्लेख करण्यात आला आहे. हे चुकीचे असून यामुळे तमाम  शिवभक्तांच्या भावना तिव्र झाल्या आहेत. तरी हा विषय गांभीर्याने घेत त्वरित निवेदा दुरुस्त करून संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रंगरंगोटी करण्यात यावी अन्यथा नगरपालिके विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही सदर निवेदनातून देण्यात आला आहे निवेदन देतेवेळी संजय शिनगारे,  रमाकांत गलांडे, गणेश माने, अशोकभाऊ सोनोने, गणेश सोनोने,रमेश इंगळे, अमोल अंधारे, राजेश झापर्डे ,किशोर भोसले, पंकज गमे, भिकाजी रेठेकर, बोरकर आदींची उपस्थिती होती.

Exit mobile version