आकाशवाणी चौकातील सर्कलला “जिजाऊ सर्कल” नाव देण्याची मागणी

जळगाव प्रतिनिधी । आकाशवाणी चौकातील सर्कलला “जिजाऊ सर्कल” असे नाव देण्याची मागणी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली. राजमामा जिजाऊ जयंतीनिमित्ताने  आकाशवाणी चौकातील सर्कल येथे बुधवारी १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता महापौर जयश्री महाजन व जिल्हाबँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्याउपस्थितीत अभिवादन करण्यात आले.

 

कोरोना काळात गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लावण्यात आले होते. सध्या कोरोना रूग्ण संख्यावाढत असली तरी कोरोनाचे नियमांचे पालन करून सर्वजनिक कार्यक्रम साजरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने शहरातील आकाशवाणी चौकातील तयार करण्यात आलेल्या सर्कल येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने बुधवार १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन महापौर जयश्री महाजन आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. दरम्यान आकाशवाणी चौकात तयार होत असलेल्या सर्कलला “जिजाऊ सर्कल” असे नाव देण्यात यावे अशी मागणी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

 

याबाबत महापौर जयश्री महाजन म्हणाल्या की, आकाशवाणी चौकातील नव्याने तयार करण्यात आलेल्या सर्कलला राजमाता जिजाऊ यांचे नाव हे योग्य आहे. सर्कलला “जिजाऊ सर्कल” असे नाव देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.  याप्रसंगी शंभू पाटील, पुरूषोत्तम चौधरी, विनोद देशमुख आदी उपस्थित होते.

Protected Content