Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वरणगाव सेतू सुविधेची तपासणी करण्याची मागणी

वरणगाव प्रतिनिधी । वरणगाव बस स्टॉप जवळील सेतू सुविधा केंद्रमध्ये शासकीय कामासाठी लागणारे आधार कार्ड नवीन व प्रिंट करण्यासाठी लागणारे चलन हे शासन नियमानुसार न घेता नागरिकांची नाहक लुटमार होत असून ही लूटमार थांबवून या सेतू सुविधेची तपासणी करुन परवाना रद्द करण्यात यावा, असे पीपल्स रिपब्लिकन पार्टी उपजिल्हाध्यक्ष राजेश इंगळे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत  यांना निवेदनाद्वारे केली आहे.

वरणगाव शहरातील व परिसरातील गाव खेड्यातले नागरिक हे शासकीय कामानिमित्त लागणारे कागदपत्र काढण्यासाठी या सेतू सुविधा केंद्रात येत असतात व त्यातच शासनाच्या कामासाठी लागणारे आधार कार्ड हे महत्त्वाचे असून शालेय विद्यार्थ्यांची येथे गर्दी दिसून येत आहे कोरोना संसर्ग आजाराचे सर्व नियम तुडवत जास्त प्रमाणात शालेय विद्यार्थी व नागरिक एकत्र दिसुन येत आहे.

कोरोना संसर्ग आजाराने सर्वसाधारण गोरगरीब नागरिकांची जगणे हे जिकरीचे झाले. असून त्यातच या सेतू सुविधा केंद्रांमध्ये अतिरिक्त चलन घेणे सुरू असून नवीन आधार कार्ड चे दर हे प्रत्येक व्यक्तीकडून शंभर रुपये व प्रिंट आधार कार्ड चे दर हे ऐंशी रुपये प्रमाणे आकारणी केली जात आहे. परंतु याबाबतीत कोणत्याही प्रकारचे चलन भरल्याची शासन नियमानुसार पावती दिली जात नसुन व तसेच इतर दाखले काढण्यासाठी सुद्धा अतिरिक्त चलन हे घेतले जात आहे. अशाप्रकारे नागरिकांची होणारी लूटमार थांबवून या सेतू सुविधा ची तपासणी करावी व सेतू सुविधा चा परवाना रद्द करण्यात यावा

या अनुषंगाने पीपल्स रिपब्लिकन पार्टी उपजिल्हाध्यक्ष राजेश इंगळे यांनी माननीय जिल्हाधिकारी सो जळगाव यांना निवेदनाद्वारे अर्ज सादर करून संबंधित विषयी येणाऱ्या  आठ दिवसांत सेतू सुविधा केंद्राची तपासणी न झाल्यास अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा हा देण्यात आलेला आहे.

Exit mobile version