Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अभ्यासिकेतील निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी

वरणगाव प्रतिनिधी । शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील हनुमान नगर येथे अभ्यासिके संदर्भात झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी करून तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूरक वातावरण व अभ्यासाची सोय व्हावी, यासाठी शिवसेनेने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर शेख यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, वरणगाव नगरपरिषदे द्वारा निर्मित प्रभाग क्रमांक 10 मधील हनुमान नगर येथील मोकळ्या जागेतील अभ्यासिकेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून एका वर्षाच्या आत इमारत गळती  सुरू झाली आहे तसेच इमारतीचा दरवाजा अतिशय तकलादू असून एक लाथ मारल्यास  त्याचे तुकडे तुकडे होतील इमारतीच्या वर जाण्यासाठी जिन्याला गेट ची आवश्यकता होती ते बसवण्यात आले नाही येथे संडास बाथरूम मध्ये पाण्याची व्यवस्था नाही. अभ्यासिकेत अभ्यास करण्यासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांना पाण्याची व्यवस्था नाही इमारतीच्या आजुबाजूला मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रकारे गवत उगवले आहे. त्याची साफसफाई न झाल्याने साप विंचू यांचा नित्य वावर असतो काही लोक माजी लोकप्रतिनिधींचे हस्तक येथे अनाधिकृतपणे प्रवेश करून वाढदिवसाच्या पार्ट्या रात्रीचे नसेली कार्यक्रम करून बराच वेळा येथील शांतता भंग करतात सदरच्या इमारतीत अभ्यासाचा पोषक असे वातावरण नाही.

विद्यार्थ्यांना बसण्यासाठी टेबल खुर्च्या अभ्यासासाठी पुस्तके वाचनासाठी आवश्यक साहित्य पुरेशी वर्तमानपत्रे व इतर आवश्यक सोयी-सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत तरी प्रशासनाने त्वरित लक्ष घालून सदरच्या अभ्यासिकेला मूर्त स्वरूप देऊन विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण तयार करावे अन्यथा सदर बाबतीत न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन शिवसेना उपजिल्हा संघटक विलास मुळे मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफर अली उर्फ हीप्पी,  पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, अल्पसंख्यांकाचे उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी, संतोष माळी,, अतुल पाटील, राहुल बावणे, विनोद सुरवाडे, ललित जावळे, योगेश कोळी यांच्यासह शिवसैनिक व सदर अभ्यासिकेत अभ्यास करणारे निखिल चौधरी, मंगेश चव्हाण, प्रतीक मराठे, शुभम घुले, आकाश केली, राहुल भोई, कुंदन धनगर, निलेश धनगर, विकास भाई, शुभम धनगर, विजू वंजारी, रोशन वंजारी, विकी चौधरी, तुषार वाघे, पवन चौधरी, पुष्पक माळी, जयेश कापडे, ज्ञानेश्वर हरदे, स्वप्निल देव घाटोळे, अविनाश जाधव, शुभम माळी, सचिन धनगर, अक्षय भुजडे, कुणाल सुरवाडे, अजय सुरवाडे, चिराग पाटील, अजय पालीमकर, भूषण माळी, चंदन गुंजकर, महेंद्र बुनकर, किरण माळी, मुकेश राजपूत, राहुल चौधरी, सुरज बावणे, विजय वानखेडे, राज वंजारी, सागर धनगर, पिल्लू, दिनेश, मराठे निखील हजबन यांचेसह अभ्यासिकेत अभ्यास करणारे व स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी उपस्थित होते.

 

Exit mobile version