अमळनेरातील रस्त्यांची कामे तात्काळ करण्याची मागणी

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील प्रभाग क्र.९ मधील भुयारी गटारींच्या कामांमुळे रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असून या रस्त्यांची कामे तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी पंकज चौधरी यांच्यातर्फे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना करण्यात आली आहे.

शहरातील सर्वात जास्त कर देणार, व्यापारी वस्ती असलेल्या प्रभाग क्र. ९ मध्ये भुयारी गटारीचा कामामुळे रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे. प्रभागातील स्टेट बँक ते बस स्टॅण्ड रोड वरील निकृष्ट कामाबाबत मागील काळात तक्रार करून पुन्हा करण्यास चौधरी यांनी भाग पाडले होते. पांच पावली देवी ते विजय फरसाण रोड, डॉ.अंजली चव्हाण ते दुर्गा टी. डेपो तसेच स्टेट बँक ते बस स्टॅण्ड ठिकाणी भुयारी गटाराचे काम पूर्ण होऊन सहा महिने होऊन देखील रस्त्यांची कामे होत नसल्याने रहिवासी व व्यापारी त्रस्त झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंकज चौधरी, जिल्हा नियोजन समिती जळगाव यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन सदर रस्ते तात्काळ करावे. अशी मागणी केली आहे.

सदर रस्ते तात्काळ न केल्यास व्यापारी बांधव व नागरी हितार्थ आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असे निवेदनात म्हटले आहे. पांच पावली देवी ते गीता प्रोव्हिजन पर्यत निवेदा देखील निघाली होती. परंतु निधीमुळे काम थांबले असल्याचे व तात्काळ करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिले आहे. निवेदनावर पंकज पंडित चौधरी व अक्षय अग्रवाल यांचा स्वाक्षरी आहे.

 

Protected Content