बनावट डॉक्टरांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरासह तालुक्यातील मुन्नाभाई एमबीबीएस बनावट डॉक्टरांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू असून प्रशासनाने या बनावट डॉक्टरांवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा सर्व डॉक्टर उपोषण व आंदोलन करतील, अशा इशारा यावल तालुका डॉक्टर्स असोसिएशनतर्फे नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांना निवेदनावेळी देण्यात आला.

येथील तालुका डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरासह तालुक्यात अनेक बनावट डॉक्टर्स वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. या डॉक्टरांकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसल्याचे निवेदनात नमूद आहे. या बनावट डॉक्टरांनी कोरोना काळातही  कोणताही प्रोटोकॉल न पाडता अनाधिकृत व्यवसाय करत पुरवला संसर्ग वाढवला होता हे बनावट डॉक्टर सामान्य रुग्णांच्या जीविताशी खेळ खेळत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. प्रशासनाने अद्याप त्यांचेवर कारवाई केली नसल्याने यावल तालुका डॉक्टर्स असोसिएशन असोसिएशन बडून आपणास पुन्हा विनंती करण्यात येत आहे की त्यांचेवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा सर्व डॉक्टर्स मंडळी उपोषण व तीव्र आंदोलन करतील असा इशारा निवेदनात दिला आहे.

निवेदनाच्या प्रती जिल्हा शल्य चिकित्सकासह, तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र यांनाही दिलेल्या आहेत निवेदनावर डॉ. रमेश पाचपोळे,  डॉ. मनोज वारके ,डॉ. धीरज पाटील डॉ. कुंदन फेगडे डॉ. अनिरुद्ध सरोदे डॉ. गणेश रावते डॉ. सतीश यावलकर डॉ. सुरेश महाजन यांचेसह औषधी विक्रेत्याच्या सह्या आहेत.

Protected Content