Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव तालुका काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी

dharangaon nivedan

धरणगाव, प्रतिनिधी | तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज (दि.३१) येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात येवून अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाचे लवकरात लवकर पंचनामे करून भरीव मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या १५ दिवसांपासुन सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या ज्वारी, मका, कापूस व सोयाबीन या उभ्या पिकांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानामुळे ऐन दिवाळीत शेतकरी हवालदील झालेला आहे. पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरावून घेतला आहे. नुकसानीचे पंचनामे करून तसा अहवाल शासनास पाठवून तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ७० हजार रूपये भरपाई त्वरित देण्यात यावी, तसेच तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशा मागण्या तालुका कॉंग्रेस कमिटीतर्फे करण्यात आल्या आहेत.

या मागण्या लवकर पूर्ण झाल्या नाही तर तालुका कॉंग्रेसकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही कॉंग्रेसचे सरचिटणीस विकास लांबोळे यांनी दिला आहे. यावेळी तालुका कॉंग्रेस कमिटीचे माजी तालुका अध्यक्ष सुरेश भागवत, सी.के.पाटील, कॉंग्रेस तालुका किसान सेल अध्यक्ष सुरेश चव्हाण, जगदीश चव्हाण, विजय जनकवार, रोटवदचे कार्यकर्ते राजेश पाटील, रामचंद्र माळी, विकास लांबोळे, तसेच युवक कॉंग्रेसचे भूषण भागवत, गौरव चव्हाण आणि कॉँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version