Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिरसाळे येथील ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माहिती अधिकाराच्या अंतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यासह गावातील असुविधांसाठी कारणीभूत ठरलेले तालुक्यातील शिरसाळा येथील ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथे माहिती अधिकार मध्ये माहिती मागितली असता ग्रामसेवक यांनी कोणत्याही प्रकारे माहिती दिली नाही. त्यामुळे अपील दाखल केले होते. त्यावेळेस दहा दिवसात माहिती देतो असे सांगितले. एवढेच नव्हे तर गट विकास अधिकारी यांनी माहिती देण्याचे पत्र दिनांक १६.१.२०२४ रोजी दिल्यानंतरही निगरगट्ट असलेले ग्रामसेवक करवते माहिती देत नसल्यामुळे जनतेत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

शिरसाळा येथील ग्रामसेवक करवते यांच्यावर दप्तर दिरंगाई प्रकरणी देखील कारवाई केली गेलेली आहेत. शिरसाळा येथे गटारी स्वच्छ केल्या जात नाही. गावात साफसफाई नाही. नळांना पिण्याचे पाणी दूषित येत असले तरी त्याकडे लक्ष दिले जात नाही. जनतेच्या आरोग्याशी खेळले जात आहे. शौचालय असून सुद्धा त्याचा काही फायदा नाही. तसेच, आजूबाजूला घाणीचे साम्राज्य आहे. शौचालय वापरण्या योग्य नाही. त्यामुळे शासनाचा पैशांचा अपव्य होत असल्याचे जनतेत बोलले जात आहे. अनेक वेळा ग्रामसेक करवते ग्रामपंचायतला हजर राहत नाही. त्यामुळे जनतेच्या कामांचा खोळंबा होत आहे.यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Exit mobile version