Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वृक्षाची कत्तल करणाऱ्यावर कारवाईची मागणी

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । वृक्ष लागवड करणे, ही काळाची गरज आहे. मात्र, तालुक्यातील पिंप्री खु ।। येथे श्रीराम मंदिर परिसरात काही रहिवासींकडून झाडाची कुठलीही पूर्वपरवानगी न घेता झाडाची कत्तल करण्यात आली आहे. याप्रकरणी वृक्षप्रेमींकडून संताप व्यक्त होत असून कारवाईची मागणी होत आहे.

तालुक्यातील पिंप्री खु ।। येथे श्रीराम मंदिर परिसरात असलेले चौधरी मेडिकल च्या जवळ लिंब या डेरेदार वृक्षची कत्तल होताना  पिंप्री येथील काही निसर्ग प्रेमी यांच्या निदर्शनास आले. घडलेल्या प्रसंगाने अतिशय चुकीचा संदेश जात असुन निसर्गाच्या हानी कारणाऱ्यावर कारवाई होईल का  ? वृक्ष तोडण्याची रीतसर परवानगी घेतली का ? अशी मागणी  येथील निसर्ग प्रेमी गोकुळ चित्ते सर यांनी केली तसेच घडलेल्या घटने बाबत ग्रामविकास अधिकारी श्री बोरसे यांना तात्काळ  कळवले. घटना नेमकी काय आहे हे तात्काळ माहिती घेतो असे श्री बोरसे यांनी संगितले. आज कोविड कालावधी मध्ये लोकांना ऑक्सिजन साठी काय हाल झाले हे आपण पाहिलं आता निसर्ग निर्मित ऑक्सिजन वर हल्ला होत असताना वृक्ष कत्तल करणे हे  निंदनिय आहे . संबंधितावर कारवाई व्हावी.

 

Exit mobile version