Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भोई समाज सदस्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । साक्री येथील भोई समाजाच्या सदस्यांवर भ्याड हल्ला करणाऱ्या धर्मांधांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीचे निवेदन भोई समाज युवा मंच उत्तर व भोई समाजातर्फे पोलिस अधीक्षक यांना देण्यात आले.

सुत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, 18 मार्च 2022 रोजी होळी आणि धुलीवंदन या सणानिमित्ताने आमचे भोई समाज बांधव सण साजरा करत असतांना डी. जे. आवाजाचे निमित्त करून करुन काही धर्माधांनी सण साजरा करणाऱ्या समाज बांधवांवर अचानक हल्ला केला. दगड विटा आणि धारदार हात्याऱ्यांनी हल्ला करून समाज बांधवांना जखमी केले.  त्यात भोई समाजाचे तीन बांधव जखमी झाले. त्यापैकी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. एक समाज बांधवाला ओम क्रिटीकेअर धुळे येथे ॲडमिट केले असुन दुसऱ्याच्या हतावर व अंगावर तिक्ष्ण हात्यारांनी वार  केल्यामुळे हताच्या नसा कापल्या गेल्या आणि गंभीर दुखापत झाल्याने धुळे येथे ॲडमिट केले. हात व जिव वाचविण्यासाठी तात्काळ मुंबई येथे नेण्याची सुचना डॉक्टरांनी केली. त्यानुसार दुसऱ्या समाज बांधावाला मुंबई येथे ऑपरेशनसाठी पाठविले आहे. इतरांचा धार्मिक सण साजरा करत असतांना आम्ही कधी आडकाठी येत नाही.

संविधानाने सगळ्यांना आप आपले सण साजरा करायाचा अधिकार दिले असतांनाही सण साजरे करताना तरीही आम्ही सुरक्षित राहीलो नाही. भ्याड हल्ला करणाऱ्या धार्माध्यांनाच्या विरोधात कठोरात कठोर कारवाईसह कलम लावून त्यांचा विरोध गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी आणि संबंधित गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्यात यावी तथा विनंती व आवाहन भोई समाज युवा मंच उत्तर व भोई समाज पारोळा वतीने करत आहे. कार्यवाही न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात भोई समाजातर्फे आंदोलन छेडण्यात येईल, त्यासाठी संपुर्ण पोलिस प्रशासन जबाबदार राहील या संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी  मागणी पारोळा भोई समाजातर्फे  पारोळा पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनव्दारे इशारा देण्यात आला आहे.

निवेदन देताना भोई समाजा युवा मंच उत्तर महाराष्ट्र महा संघटक प्रमुख जयेश भोई, सागर भोई, गौरव भोई, प्रविण भोई, सागर भोई, सचिन भोई, ज्ञानेश्वर भोई, पंकज भोई, रितेश भोई, विशाल भोई, प्रतिक बडगुजर व भोई समाज युवा मंच महाराष्ट्र उपस्थित होते.

Exit mobile version