Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भालोद येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील भालोद येथील एका स्वस्त धान्य दुकान चालकाचा मनमानी कारभार सुरू असून त्यांच्या परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.

यावल तालुक्यातील भालोद येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ७३ हे भालोद कल्पना अनिल भालेराव यांच्या मालकीचे असून संजय भालेराव हे या दुकानास भाड्याने चालवता मात्र ते परिसरातील शिधापत्रीका धारक लाभार्थ्यांना धान्य देत नसल्याच्या तक्रारी असुन , उलट पक्षी धान्य घ्याला येणार्‍या लाभार्थ्यांना धान्य न देता धमकी व दमदाटी करून मनमानी कारभाराने दुकान चालवतात, लाभार्थ्यांना धान्य न देता त्या धान्याला काळ्या बाजारात विकतात संजय भालेराव या भाडोत्री स्वस्त धान्य दुकान मालकाच्या भ्रष्ट कारभाराने अनेक लाभार्थींना आपल्या हक्काच्या धान्यापासून वंचित राहावे लागत असल्याचा गावातील नागरिकांचा आरोप आहे.

दरम्यान, कल्पना अनिल भालेराव यांच्या स्वस्त धान्य दुकानाच्या भोंगळ कारभाराची त्वरीत प्रशासनाकडून चौकशी होऊन त्यांचा स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द झाला करण्यात यावा अशी मागणी कॉंग्रेसच्या स्वस्त धान्य कमिटी जिल्हा अध्यक्षा चंद्रकला इंगळे , युवक कॉंग्रेसचे रावेर विधान क्षेत्र प्रमुख फैजान शाह ,शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष कदीर खान,शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे यांच्यासह असंख्य लाभार्थी यांनी तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. संबधित स्वस्त धान्य दुकानदारावर परवाना रद्द करण्याची कारवाई न झाल्यास कमिटीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा चंद्रकला इंगळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना दिला आहे.

Exit mobile version