Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘मातोश्री’ला तब्बल चार वेळेस गंडविले ; डिलिव्हरी बॉयला अटक

0Aaditya Thackeray 11
मुंबई (वृत्तसंस्था) ऑनलाइन शॉपिंग न केलेल्या वस्तू युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नावावर खपवून ‘मातोश्री’ला तब्बल चार वेळेस गंडवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला खेरवाडी पोलिसांनी पाचव्यांदा रंगेहाथ अटक केली आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. राज्यभरात जनआशिर्वाद यात्रेतून ते राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. मात्र, याच गोष्टीचा फायदा घेत एका बड्या ऑनलाईन शॉपिंग कंपनीत नोकरीला असलेल्या धीरेन मोरे (२०) या डिलिव्हरी बॉयने तब्बल चार वेळेस ‘मातोश्री’ला गंडविले. धीरेनने आदित्य ठाकरे याच्या नावाने पार्सल तयार करून पहिल्यांदा त्या पार्सलमध्ये हलक्या दर्जाचे हेडफोन पॅक करून ते ‘मातोश्री’वर पोहोचवले. यावेळी ‘मातोश्री’वरील कर्मचाऱ्यांनी ते पार्सल परस्पर घेऊन धीरेनला पैसे दिले होते. त्यानंतर त्याची हिंमत वाढतच गेली. मग धीरेनने तब्बल चार वेळा आदित्य यांनी आॅर्डर न केलेल्या वस्तू पोहचविल्या आणि त्याचे जास्तीचे पैसे उकळले. चार वेळा यश आल्यानंतर पाचव्यांदाही आरोपी धीरेनने हिंमत केली. मात्र, स्वतः आदित्य ठाकरेंनीच ऑनलाईन वस्तू मागवल्या नसल्याचा खुलासा केल्यानंतर त्याचे बिंग फुटले. त्यामुळे पाचव्यांदा गंडा घालताना खेरवाडी पोलिसांनी आरोपी धीरेन मोरे याला रंगेहाथ अटक केली.

Exit mobile version