Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिल्लीचे मुख्यमंत्री तिहार तुरूगांतून पाहणार लोकसभेचा निकाल; उद्या जामिनाची मुदत संपणार

दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिल्ली दारू घोटाळा प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर राऊस एव्हेन्यू न्यायालयात सुनावणी झाली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वैद्यकीय कारणास्तव दाखल केलेल्या अंतरिम जामीन अर्जावर दिल्ली न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. याप्रकरणी न्यायालयाने ५ जूनची तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे त्यांना उद्या पुन्हा सरेंडर व्हावे लागणार आहे.

केजरीवाल यांनी त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे सात दिवस जामीनाची मुदत वाढविण्याची मागणी कोर्टाला केली होती. शनिवारी या याचिकेवर कोर्टात सुनावणी झाली. ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेला विरोध केला. कोर्टात केजरीवाल यांच्यासाठी एन. हरिहरन आणि तपास यंत्रणा ईडीच्यावतीने एएसजी एस.व्ही.राजू यांनी काम पाहीले. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे देखील या सुनावली ऑनलाईन युक्तीवाद केला. शुक्रवारी केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की ते 2 जून रोजी सरेंडर करणार आहेत. त्यांनी आपण कोर्टाच्या आदेशाची वाट पाहू असे म्हटले नव्हते. अशा प्रकारची वक्तव्य करून ते कोर्टाची दिशाभूल करीत असल्याचा युक्तीवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केला. दरम्यान, ईडीने अरविंद केजरीवाल यांचे काही लाईव्ह व्हिडिओ कोर्टाला दाखवले. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवरील आपला निर्णय 5 जूनपर्यंत राखून ठेवला आहे. परंतू केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाची मुदत उद्या 2 जून रोजी संपत आहे. त्यामुळे उद्या तिहार तुरुंगात त्यांना हजर व्हावे लागणार आहे.

Exit mobile version