Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एक्झिट पोलचे सर्व ट्विट हटवा ; निवडणूक आयोगाचे आदेश


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल संदर्भातील ट्विटवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. याची गंभीर दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने एक्झिट पोलचे सर्व ट्विट तात्काळ हटविण्याची आदेश दिले आहेत. दरम्यान, ट्विटर इंडियाकडून मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

 

 

तीन माध्यम समूहांना निवडणूक आयोगाने एक्झिट पोलवरून नोटीस बजावली असून ४८ तासांत त्यावर स्पष्टीकरण मागितले आहे. तर दुसरीकडे १९ मे रोजी सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यास मात्र निवडणूक आयोगाने माध्यमांना परवानगी दिली आहे. ‘लोकसभा निवडणूक २०१९’च्या एक्झिट पोलसंदर्भात असलेले सर्व ट्विट तत्काळ हटवण्यात यावेत, असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने ट्विटर इंडियाला दिले आहेत. दरम्यान, ट्विटरवर प्रचंड संख्येने एक्झिट पोलशी संबंधित ट्विट असून या पोस्ट डीलीट करण्याचे मोठे आव्हान ट्विटरपुढे असणार आहे.

Exit mobile version