Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘इन्स्टाग्राम’वर बनावट खाते तयार करून तरूणीची बदनामी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील योगेश्वर नगरात राहणाऱ्या तरूणीच्या नावाने इन्स्टाग्राम वर बनावट खाते तयार करून तरूणीची बदनामी केल्याचे गुरूवारी सायंकाळी उघडकीला आले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर सायबर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की,  योगेश्वर नगरात २३ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह राहतात. २६ मे ते ३ जून २०२१ दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या नावाचा वापर करून इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार केले. या खात्यावर या तरूणीचा फोटो अपलोड केला. त्यानंतर तरूणीचे इन्स्टाग्रामवरील खाते खरे भासवून त्यांच्या मित्र व मैत्रिणींशी विचीत्र पध्दतीने चॅटिंग सुरू केले. हा प्रकार तरूणीला ३ जून रोजी गुरूवारी दुपारी समजला. त्यांनी तातडीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात सायंकाळी ७.३० वाजता धाव घेतली. बनावट खाते तयार करून बदनामी केल्याप्रकरणी तरूणीच्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहे. 

Exit mobile version