Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बनावट चॅटींग तयार करीत महिला डॉक्टरची बदनामी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बनावट चॅटींग तयार करुन व महिलेचा फोटो वापरुन त्याचे स्क्रिन शॉट तीच्या होणार्‍या भावी पतीला पाठवित महिला डॉक्टरची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील रहिवासी असलेल्या डॉक्टर तरुणीचा फोटो वापरुन त्या वापरत असलेला मोबाईल क्रमांकावरुन बनावट चॅटींग तयार केले. तसेच त्याचे स्क्रिन शॉट तयार करुन ते त्या महिला डॉक्टरच्या इन्स्टग्राम अकाऊंटवरुन त्यांच्या होणार्‍या भावी पतीला पाठवित त्यांची बदनामी केल्याचा प्रकार ६ ऑगस्ट रोजी रोजी उघकीस आला. दरम्यान, त्या महिला डॉक्टरने तात्काळ सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी ८ ऑगस्ट रोजी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहे.

 

Exit mobile version