Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळगाव-दोधवद शिवारात मृत अवस्थेत आढळले हरिण

अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील अमळगाव-दोधवद शिवारात एका शेतात कैट जातीचे हरीण मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे।

 

अमळनेर तालुक्यातील अमळगाव-दोधवद शिवारातील शेतात कैट जातीचे हरीण मयत आढळून आले. ही घटना संबंधित शेतमालकाला सकाळी दैनंदिन कामकाजानिमित्त शेतात गेल्यावर नजरेस पडली. त्यांनी लागलीच सदर घटना वनविभागाला कळवली. सदर हरण हे सर्पदंश किंवा विंचू (नैसर्गिक) चावल्याने मयत झाले असावे? असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.

 

 

दरम्यान पारोळा वनविभागाने घटनास्थळी जावून,मृत हरीण पुढील विल्हेवाट लावण्यासाठी ताब्यात  घेतले असून,हरणाचा मृत्यू हा.सर्पदंश ने झाला असावा? असे व्यक्त केले आहे.

Exit mobile version