Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गरजू विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ अक्षय्य शिक्षण अभियान

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाउनचा काळ हा सर्वांसाठीच आव्हानात्मक ठरला आहे. सगळ्याच क्षेत्रांमध्ये याचा परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतो. परंतु शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घेऊन आला आहे. शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमा अंतर्गत ऑनलाइन शिक्षणाची ज्ञानगंगा सर्वत्र वाहू लागली. परंतु लॉकडाऊनच्या काळात आर्थिक अडचणीमुळे मोबाईल व इतर सुविधांच्या अभावी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना बऱ्याच आव्हानाना सामोरे जावे लागत आहे. या विद्यार्थ्यांच्या शिक्षण बंद पडू नये, म्हणून दीपस्तंभ फाउंडेशन तर्फे रतनलाल सी. बाफना ट्रस्ट, हाय मीडिया लेब्रोटरी व पुखराज पगारिया फाऊंडेशन यांच्या सहकार्यातून 10 वी व 12 वीच्या  गुणवंत व गरजू  विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ अक्षय्य शिक्षण अभियान राबविण्यात येत आहे.

तसे तर चांगले काम करायला कुठलाही मुहूर्त लागत नाही. आणि आज तर अक्षय्य तृतीया. या दिवसाचे एक वेगळे महत्व आहे. त्या दिवशी जे केले त्याचे अक्षय्य मिळते देणाऱ्यास व घेणाऱ्यास. जेवढे दान कराल तेवढे वरदान आज मिळते. दान श्रेष्ठ असते परंतु  ज्ञानदानाचे कार्य हे सर्वश्रेष्ठ असते. शिक्षण व्यक्तीला नंतर कधीच  हात पसरवण्याची वेळ येऊ देत नाही व ती व्यक्ती इतरांनाही उभारण्यासाठी सहकार्य करू शकते.

या अभियानात सहभागी होऊ शकतात.

ज्या व्यक्तींना /संस्थांना  या अभियानात आर्थिक योगदान / मोबाइल देऊन विद्यार्थ्यांना सहकार्य करायचे असल्यास देणगीसाठी संस्थेशी 8421616545संपर्क करावा.

अभियानाबाबत अधिक माहिती – 

१. आर्थिक परिस्थिती अत्यंत अडचणी ची असलेले गुणवंत विद्यार्थी

२. दिव्यांग विद्यार्थी

३. अनाथ विद्यार्थी यांना

शिक्षण घेता यावे यासाठी खालील बाबींचे सहकार्य.

१) अँड्रॉइड मोबाईल.

२) परिक्षा फॉर्म /ट्यूशनस फी साठी आर्थिक सहाय्य

३) पुस्तके

गरजू विद्यार्थ्यांनी स्वतः किंवा त्यांच्या शिक्षकांनी अर्ज करताना –

1. स्वतः ची संपूर्ण माहिती

2. मिळवलेले यश / विशेष प्राविण्य.

3. कौटुंबिक माहिती.

4. आर्थिक परिस्थिती.

5. कोणती मदत हवी आहे.

6. शिफारस देणाऱ्या शिक्षकांचे नाव व संपर्क असे सविस्तरपणे अर्जात नमूद करून या क्रमांकावर 8380076545 whatsapp करावी. ( कॉल करू नये फक्त अर्ज पाठवावा. अर्ज पडताळणी नंतर गुणवत्तेच्या आधारे व आर्थिक परिस्थितीनुसार 200 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना संपर्क केला जाईल.)

 

Exit mobile version