Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महापालिकेत केक कापून दिपककुमार गुप्तांचे अनोखे आंदोलन !

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील महानगरपालिका हद्दीतील विविध व्यापारी संकुलातील अनधिकृत बेसमेंटवर कारवाई करण्याची मागणी गेल्या ३ वर्षांपासून माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी महानगरपालिकेला वेळोवेळी निवेदन, आंदोलन आणि उपोषण केलेले आहे. मात्र अद्यापपर्यंत महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून कुठलीही गंभीर दाखल घेतली नाही. या मागाीला आज तीन वर्ष पुर्ण झाल्याने अखेर तिसऱ्या वर्षी महापालिकेच्या आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या दालनाच्या बाहेर केक कापून अनोखे आंदोलन करण्याचे पाहायला मिळाले.

जळगाव शहरातील विविध व्यापारी संकुलातील बेसमेंटच्या जागी पार्किंगच्या ऐवजी व्यावसायिक वापर करण्यात आला आहे. दरम्यान व्यापारी संकुलात बेसमेंटमध्ये वाहन पार्किंग ऐवजी सुरू असलेल्या व्यवसाय वापरामुळे वाहनधारकांना संकुलात कामानिमित्त जाताना वाहन लावण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे वाहनाची कोंडी होते व रहदारीला अडथळा निर्माण होते परिणामी वाहने रस्त्यावर लावल्याने शहर वाहतूक शाखेच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईला देखील वाहनधारकांना सामोरे जावे लागते. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी गेल्या ३ वर्षांपूर्वी ७ डिसेंबर २०२० रोजी महानगरपालिका आयुक्त कार्यालयाच्या दालनाच्या बाहरे एकदिवसीय उपोषण देखील केले होते. त्यावेळी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त यांच्याशी चर्चा करून त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला गेल्यावर्षी २ वर्षे पूर्ण झाले होते. त्यावेळी देखील माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्त यांनी निवेदन देऊन “केक खाओ आंदोलन” करत महापालिका प्रशासनाचा निषेध केला होता. असे होवून देखील आता या मागणीला ३ वर्षे पूर्ण झाले आहे. या अनुषंगाने दीपक कुमार गुप्ता यांनी गुरुवारी ७ डिसेंबर रोजी दुपारी महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या तालनाच्या बाहेर केक कापून अनोखे आंदोलन करत महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभाराचा निषेध केला आहे.

या आहेत मागण्या

जळगाव शहरातील व्यापारी संकलनाच्या खाली असलेल्या पार्किंग झोन मोकळा करावा, कोणालाही पाठीशी न घालता निपक्षपणे त्या ३७ मालमत्ता धारकांची मालमत्ता सील करणे ऐवजी ती जागा तत्काळ पार्किंगची व्यवस्था करावी, सुनावणी बाकी असलेल्या इतर ९६ प्रकरणांचा देखील तत्काळ निर्णय घेऊन त्या जागी पार्किंग व्यवस्था करावी, पार्किंगच्या ठिकाणी बांधलेले दुकाने तोडून वाहने लावण्यासाठी जागा मोकळी करावी, असे देखील मागणी करण्यात आले आहे.

Exit mobile version