Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दीपा मलिक व बजरंग पुनियाला ‘खेलरत्न’ तर जडेजाला ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर

khelratn purskar

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | पॅरा ऑलिम्पिकमधील पहिल्यांदा भारताला पदक मिळवून देणारी महिला अॅथलिट दीपा मलिक आणि आशियाई गेम्स तसेच कॉमनवेल्थ खेळात सुवर्ण पदक पटकावणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया या दोघांना प्रतिष्ठेचा ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. तर क्रिेकेटपटू रवींद्र जाडेजाला यंदाचा ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. आज दुपारी पुरस्कार समितीने ही घोषणा केली.

 

भारताच्या क्रीडा पुरस्कार समितीने विविध क्रीडा पुरस्कारासाठी खेळाडूंच्या नावाची शिफारस केली आहे. १६ आणि १७ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या बैठकीत खेळाडूंच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. खेलरत्न पुरस्काराबरोबरच द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद (माका) ट्रॉफी या विविध पुरस्कारांसाठी खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आल्यानंतर ते सर्व पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत.

खेलरत्न पुरस्कार :-
– बजरंग पुनिया – बॅटमिंटन
– दीपा मलिक – पॅरा अॅथलेटिक्स

द्रोणाचार्य पुरस्कार (प्रशिक्षक) :-
– विमल कुमार – बॅटमिंटन
– संदीप गुप्ता – टेबल टेनिस
– मोहिंदर सिंघ धिल्लों – अॅथलेटिक्स

द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार :-
– मर्जबन पटेल – हॉकी
– रामबीर सिंह खोखर – कबड्डी
– संजय भारद्वाज – क्रिकेट

अर्जुन पुरस्कार (खेळाडू) :-
– ताजिंदरपाल सिंग टूर – अॅथलेटिक्स
– मोहम्मद अनास याहिया – अॅथेलेटिक्स
– एस. भास्करन – शरीरसौष्टव
– सोनिया लाटकर – बॉक्सिंग
– रवींद्र जडेजा – क्रिकेट
– चिंगलेनसाना सिंह कंगुजम – हॉकी
– अजय ठाकूर – कबड्डी
– गौरव सिंग गिल – मोटर स्पोर्ट्स
– प्रमोद भगत – पॅरा स्पोर्ट्स (बॅटमिंटन)
– अंजुम मौदगिल – शूटिंग
– हरमित राजूल देसाई – टेबल टेनिस
– पूजा ढांडा – घोडेस्वार
– गुरप्रित सिंह संधू – फुटबॉल
– पूनम यादव – क्रिकेट
– स्वप्ना बर्मन – अॅथलेटिक्स
– सुंदर सिंह गुर्जर – पॅरा स्पोर्ट्स (अॅथलेटिक्स)
– बी. साई प्रणित – बॅटमिंटन
– सिमरन सिंह शेरगिल- पोलो

ध्यानचंद पुरस्कार :-
– मॅन्युअल फ्रेडरिक्स – हॉकी
– अरुप बासक – टेबल टेनिस
– मनोज कुमार – कुस्तीपटू
– नितिन किर्तेन – टेनिस
– सी. लालरेसंगा – तिरंदाज

Exit mobile version