Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत उद्या इच्छुकांच्या मुलाखती

deelip valse patil जळगाव प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत २४ रोजी पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अलीकडेच इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवले होते. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात २४ रोजी सकाळी ११ वाजता पक्ष कार्यालयात जिल्ह्यातील ११ मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. पक्षाचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील, निरीक्षक रंगनाथ काळे, करण खलाटे हे मुलाखती घेतील. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवारांनी इच्छा प्रकट केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने जागा वाटपाबाबत निर्णय न होतांनाही सर्वच्या सर्व म्हणजे अकरा मतदारसंघात चाचपणी सुरू केली असतांना दुसरीकडे काँग्रेसनेही काही मतदारसंघांवर दावा सांगितला आहे.

Exit mobile version