नरेंद्र मोदींच्या हस्ते शिळा मंदिराचे लोकार्पण

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज देहूमध्ये शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहू दौर्‍यावर असून त्यांच्या हस्ते शीळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या दौर्‍यासाठी अतिशय कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. लोहगाव विमानतळावर पंतप्रधानांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यानंतर मोदींच्या हस्ते शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे वारकर्‍यांशी संवाद साधणार असून त्यांच्या उपस्थितीत सभेचे सुध्दा आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ता मोदी आणि उध्दव ठाकरे हे एकाच मंचावर येण्याची शक्यता निर्माण झाली होती. तथापि, उध्दव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला जाणे टाळल्याने याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Protected Content