Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते मेट्रो मार्गाचे लोकार्पण !

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । गुढीपाडव्याच्या शुभदिनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते लाल फित कापून दहिसर ते आरे मिल्क कॉलनी दरम्यानच्या मुंबई मेट्रो ७ आणि मेट्रो २A चे लोकार्पण आज करण्यात आले. वाहतूक कोंडीतून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सुभाष देसाई आणि आ. सुनील प्रभू, महापौर किशोरी पेडणेकर आणि पालकमंत्री अस्लम शेख आदी उपस्थित होते.

 

मेट्रो मार्गाचे लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो अधिकाऱ्यांकडून मेट्रो संबधित माहिती जाणून घेतली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी मेट्रोचं तिकीट खरेदी करत मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. मेट्रोला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत सर्व प्रमुख मंत्री मेट्रो प्रवास करण्यासाठी मेट्रोतून दहिसर ते डहाणूकरवाडी असा हा प्रवास केला.

 

मेट्रो ७ आणि २A या मार्गावर एकत्रिपणे पहिल्या टप्प्यामध्ये 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. यानंतर आता या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात 15 किमी मार्गावर मेट्रो चालवण्यात येणार आहे.

 

मेट्रो-7 मार्गावर 14 स्थानके असणार आहेत. दहिसर पूर्व, ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे , गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) या स्थानकांचा समावेश आहे.

 

‘मेट्रो 2 अ’ हा  18.5 किमी लांबीचा आहे. दहिसर पश्चिम ते डीएन नगर स्थानकापर्यंत ‘मेट्रो 2 अ’ मार्ग असणार आहे. या मार्गात दहिसर पूर्व, अप्पर दहिसर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), धनुकरवाडी, वलणई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डीएन नगर अशी स्थानके असणार आहेत.

Exit mobile version