Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात आरोग्य मोबाईल व्हॅनचे लोकार्पण

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्र्वर) येथे राशी सिड्स या कंपनीतर्फे १० लाख रुपयांचे फिल्टर प्लॅन्ट व ग्रामीण भागातील गोरगरिबांना अद्यावत आरोग्य मोबाईल व्हॅन देण्यात आली आहे. या फिल्टर प्लॅन्ट व आरोग्य मोबाईल व्हॅनचे लोकार्पण आमदार किशोर पाटील यांचे हस्ते करण्यात आले. 

राशी या कंपनीच्या माध्यमातून पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथे गावातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे या हेतूने कंपनीमार्फत दहा लाख रुपयाचे ए. टी.एम. मशीन त्यामध्ये पाच रुपयात वीस लिटर शुद्ध पाणी मिळणार असून पाण्यामुळे होणारे आजारापासून काही प्रमाणात मुक्ती मिळणार आहे. या हेतूने हे फिल्टर ए. टी.एम. मशीन गावात लावण्यात आले आहे. सोबतच पाचोरा – भडगाव तालुक्यासाठी अद्ययावत अशी आरोग्य मोबाईल व्हॅन देण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये दोन डॉक्टर्स राहणार आहेत.  प्राथमिक उपचार या आरोग्य मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून पाचोरा – भडगाव मतदार संघातील नागरिकांना मिळणार आहे.

यावेळी पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक निता कायटे, रमेश बाफना, सेनेचे माजी जिल्हाउपप्रमुख गणेश पाटील, उद्धव मराठे, रासी सिड्चे डिव्हीजनल बिझनेस मॅनेजर सुनिल महाजन, डिव्हिजनल क्रॉप मॅनेजर मिलिंद चव्हाण, रिजनल बिझनेस मॅनेजर अखिल प्रताप सिंग, टेरीटरी मॅनेजर समाधान खैरनार, उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टेरीटरी मॅनेजर समाधान खैरनार यांनी केले. तर अभिमन्यू पाटील, अमोल परदेशी, मनोज राठोड यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

 

 

Exit mobile version