Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य उपकरणांचे लोकार्पण ( व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी | माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आज मान्यवरांच्या उपस्थितीत विविध आरोग्य उपकरणांचे लोकार्पण करण्यात आले.

केमिस्ट भवन, जळगाव येथे अत्‍तरदे फॉउंडेशन, अमेरिका यांच्या मुख्य मदतीने तसेच ग्लोबल लेवा पाटीदार फाउंडेशन, अ. भा. लेवा विकास महासंघ व सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर तसेच बायपॅप मशीन यांचा लोकार्पण सोहळा मा. एकनाथराव खडसे यांच्या हस्ते तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात कोव्हीड-19 ह्या आजाराने थैमान घातले आहे. ह्या आजारामुळे लाखोंच्या संख्येने जनतेला आपले प्राण गमवावे लागले आहेत.  यात विशेषतः ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळेच जास्त प्रमाणात रुग्ण दगावले आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा व त्यामुळे गेलेले निष्पाप जीव, ही संपूर्ण परिस्थिती पाहून अमेरिकेत स्थायिक असलेले आपल्याच भागातील व्यावसायीक प्रमोद अत्तरदे यांनी आपल्या मातृभूमीत एवढी विदारक परिस्थिती निर्माण झालेली असताना आपण काहीतरी करायला हवं, ह्या उदात्त भावनेने प्रेरित होऊन आपल्या काही समविचारी मित्रांच्या सहकार्याने 14 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर तसेच 21 बायपॅप मशीनची खरेदी करून अत्तरदे फाऊंडेशनच्या माध्यमातून आपल्या भारताला अर्थात जळगावी उपलब्ध करून दिले आहेत. ह्यासाठी ह्या संकल्पनेचे प्रमुख व ग्लोबल लेवा पाटीदार फाऊंडेशनचे अध्यक्ष  धनंजय कोल्हे यांनी केमिस्ट असोसिएशनचे सुनील भंगाळे व  मनोज चौधरी, ठाणे यांच्या मार्गदर्शनाने सातत्याने पाठपुरावा करून ह्या उपकरणांचा लोकार्पण सोहळा घडवून आणला.

सदर सेवा ही स्व. आय.पी. अत्तरदे सर व स्व. निखिल एकनाथराव खडसे ऑक्सिजन कान्सेंट्रेटर व बायपॅप मशीन सेवा ह्या नावाने लेवा भवनच्या माध्यमातून नियम व अटींची पूर्तता करून देण्यात येणार असल्याचे संकल्पनेचे प्रमुख  धनंजय कोल्हे व  सुनील भंगाळे यांनी सांगितले.

कार्यक्रमाप्रसंगी लेवा समाज प्रदेश संघटकपदी धनंजय कोल्हे यांची देखील  एकनाथराव खडसे तसेच केंद्रीय अध्यक्ष विष्णू भंगाळे यांनी नियुक्ती केली. या सोहळाल्याला  एकनाथराव खडसे, माजी महसूल मंत्री, खा. रक्षाताई खडसे, डॉ. ए. जी. भंगाळे,   लालचंद पाटील (उपाध्यक्ष, जिल्हा परिषद), गुरुमख जगवाणी,  विष्णू भंगाळे (जिल्हा प्रमुख – शिवसेना, जळगाव),  सौ. जयश्रीताई महाजन (महापौर-जळगाव), सौ. रंजनाताई पाटील (अध्यक्ष-जिल्हा परिषद),  ललितभाऊ चौधरी, मनोज चौधरी, ठाणे, सौ. सीमाताई भोळे (माजी महापौर, जळगाव), डॉ. स्नेहल फेगडे, सुनीलभाऊ खडके (मा. उपमहापौर)¸सुनील भंगाळे (अध्यक्ष- जळगाव केमिस्ट असोसिएशन, जळगाव),  रमण भोळे (नगराध्यक्ष, भुसावळ),   किशोर ढाके (उद्योजक, जळगाव), डॉ. किरण पाटील,  संजय कोल्हे (मा. नगरसेवक),  धनंजय शिरीष चौधरी या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शशिकांत फेगडे सर, पिटूशेठ पाटील, विजय खचणे, सलील महाजन, योगेश भोळे, राजू महाजन, अजय बढे, अमित वाणी, धनंजय कोल्हे, प्रशांत चौधरी, स्वप्नील चौधरी, यशवंत विसपुते, अतुल इंगळे, गुणवंत पाटील, सुधीर वाघुळदे, योगेश पाटील, अक्रम मणियार, शरद नारखेडे परिश्रम घेतले आहे.

 

Exit mobile version