Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपुर येथे मोफत रूग्णवाहिकेचे लोकार्पण

फैजपुर प्रतिनिधी । जळगाव येथील गरजू रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी जळगावात रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. फैजपूरचे ज्येष्ठ सुपुत्र मौलाना फतेह मोहम्मद आणि संत पंत मंदिराचे जनार्दन महाराज यांनी हिरवी झेंडी दाखवून रुग्णवाहिकेची रवानगी केली.

हि रुगण वाहिका शिव सेनेची अंगिकृत संघटना, शिक्षक सेनेच्या अल्पसंख्यांक अध्यक्ष इलयास असगर शेख व त्यांच्या पत्नी मेहेर निगार शेख यांच्यातर्फे त्यांच्या स्वर्गीय आई वडिलांच्या पुण्य प्राप्तीसाठी देण्यात आली आहे. फैजपुर येथील सुभाष चौक येथे सर्व धर्माचें धर्म गुरु यांच्या उपस्थिती एक कार्यक्रम घेण्यात आला असुन त्याचे अध्यकक्षिय स्थानी मौलाना ताहेर पटेल हे उपस्थीत होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणुन मौलाना फतेह मोहम्मद, मौलाना अनस संत पंत मंदिरचे महाराज जनार्दन हरि जी, मौलाना शौकत फलाही, मौलाना नोमान, केतन किरंगे, कलीम मेम्बर, इर्फान मेम्बर, सय्यद असगर यांच्यासह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्देश इलयास शेख यांनी मांडले तर संत जनार्दन हरी आणि मौलाना अनस यांनी लोकांची सेवा हिच खरी धर्म सेवा या विषयावर आपले विचार मांडले.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन कौसर शेख यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कामील शेख, शरिफ शेख, अखतर पहेलवान, असिफ शेख, साबीर शेख आदिंनी परिश्रम घेतले.

 

Exit mobile version