Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर ग्रामीण रुग्णालयात ड्यूरा ऑक्सिजन सिलेंडरचे लोकार्पण

रावेर प्रतिनिधी । रावेर ग्रामीण रुग्णालयात लोकवर्गणीतून उभारण्यात आलेले ड्यूरा ऑक्सिजन सिलेंडरचे लोकार्पण आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते आज करण्यात आले. या सिलेंडरच्या माध्यमातुन ४० कोरोना रुग्णांना सुमारे दहा तास ऑक्सिजन मिळणार आहे.

येथील ग्रामीण रग्णालयात लोकवर्गणीतुन सुमारे सहा लाख रुपये खर्च करून ड्यूरा सिलेंडर बसविण्यात आले आहे. उद्या पासुन या ड्यूरो सिलेंडर मधुन कोरोना बाधितांना ऑक्सिजन मिळणार आहे.त्यामुळे रावेर तालुक्यातील रग्णाची ऑक्सिजनसाठीची धावपळ थांबणार आहे.याचे लोकार्पण आज करण्यात आले आहे.यासाठी लोकवर्गणी करण्यात आली होती यात सुमारे आठ लाखाच्या वर रोख व चेक स्वरुपात रक्कम जमा झाली आहे.यातील सुमारे सहालाखाचे ड्यूरा सिलेंडर बसविले असुन  बाकी रक्कम तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या कडे सुरक्षित आहे.

यांची होती उपस्थिती- 

दरम्यान यावेळी प्रांतधिकारी कैलास कडलक, तहसिलदार उषाराणी देवगुणे, वैद्यकीय अधिकारी डॉ एन. डी. महाजन,पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे, ओबीसी सेल राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे, युवक राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रणित महाजन महेंद्र पाटील महेश लोखंडे, विलास ताठे,डॉ सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

लोकार्पणा वरुन काही काळ गोंधळ-

लोकवर्गणीतुन ड्यूरा सिलेंडर बसविले आहे.आमदार साहेब आपण याचे लोकार्पण करू नका तुम्ही येथे कोणताच निधी दिला नाही असे म्हणत भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष तथा सरपंच महेंद्र पाटील यांनी आ शिरीष चौधरी यांच्या  लोकार्पण करण्यावरच आक्षेप घेतल्यामुळे काही काळ येथे गोंधळ उडाला होता.दरम्यान आ.चौधरी लोकार्पण न करताच निघुन जात असतांना राष्ट्रवादीचे सुनिल कोंडे यांनी लोकवर्गणीत आम्ही सुध्दा निधी दिला असल्याचे सांगत आरोपाला उत्तर देत गोंधळामध्येच आ शिरीष चौधरींहस्ते लोकार्पण करून घेतले.यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

आरोग्यासाठी एक कोटीचे कामे प्रस्तावित आ चौधरी-

रावेर ग्रामीण रग्णालयात केलेला गोंधळ काहीच उपयोगाचा नाही कोरोना काळात राजकारण करू नका. ड्यूरा सिलेंडर बसविण्याची मागणी मी सुध्दा आमदार निधीतुन मंजूर केली होती. आरोग्यसाठी रावेर व यावलसाठी माझ्या निधीतुन सुमारे एक कोटी प्रस्तावित केले आहे.यामध्ये दोन ४० लाखाच्या अँम्बुलेस रावेर,यावल,फैजपुर पालिकेला अँटीजन टेस्टसाठी प्रत्येकी १०लाखाचा निधीची देणार  आहे. तसेच यावल न्हावी व रावेर ग्रामीण रुग्णालयांच्या औषधांसाठी प्रत्येकी बारा लाखाचे औषध मंजूर करून घेतल्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले.

 

Exit mobile version