Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अद्ययावत सुविधा असलेल्या रुग्णवाहिकेचे आ.पाटीलांच्या हस्ते लोकार्पण

पाचोरा प्रतिनिधी । राज्याचे ग्रामिण विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य भरात १०० रुग्णवाहीकांचे वाटप करण्यात आले आहे. त्यातीलच पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून पाचोरा येथे अद्ययावत सुविधा असलेली सुमारे २८ लाख रुपये किंमतीची रुग्णवाहीकेचा लोकार्पण सोहळा आ.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, पदमसिंग पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्षा प्रियंका पाटील, नगर परिषदेच्या गटनेत्या सुनिता पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, माजी उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, अॅड. दिनकर देवरे, नगरसेवक रहेमान तडवी, बापु हटकर, भरत खंडेलवाल, पप्पु राजपुत, सुधाकर महाजन, जितेंद्र जैन, अनिल पाटील, शिवदास पाटील, पंढरीनाथ पाटील, युवा नेते सुमित किशोर पाटील, संदिपराजे पाटील, खंडु सोनवणे, वाल्मिक पाटील, रुग्णवाहीका चालक निळकंठ पाटील, स्वीय्य सहाय्यक राजु पाटील उपस्थित होते.

रुग्णवाहीकेच्या लोकार्पण सोहळ्यानंतर आमदार किशोर पाटील यांनी राज्याचे ग्रामिण विकास मंत्री तथा ठाणे चे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे आभार मानत मार्गदर्शन करताना सांगितले की, पाचोरा मतदार संघात प्रथमच अद्ययावत सुविधा असलेली रुग्णवाहीका उपलब्ध झाली असुन आता पाचोरा व भडगाव तालुक्यातील रुग्णांनी केवळ डिझेल भरुन नाशिक, मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे आरोग्य सेवार्थ काम केले जाणार आहे. यासाठी गेल्या १५ वर्षांचा अनुभव असलेल्या निळकंठ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी रुग्णवाहीकेचा लाभ घ्यावा असे आवाहन ही त्यांनी  केले आहे. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या मंदा पाटील, सुष्मा पाटील, जया पवार, स्मिता बारावकर, मिनाक्षी आमले, बेबाबाई पाटील, बेबाबाई मोरे, संगिता गायकवाड सह मोठ्या संख्येने महिला व शिवसैनिक उपस्थित होते.

 

 

 

 

Exit mobile version