Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बच्चु कडू यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण

यावल प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालयात आज प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री ना. बच्चु कडु यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहीकेचा लोकार्पण सोहळा प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा भुसावळ नगर परिषदचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले. 

दरम्यान आज यावल ग्रामीण रुग्णालयात पार पडलेल्या महाराष्ट्र राज्याचे राज्य मंत्री ना .बच्चु कडु यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन यावल व परिसरातील गोरगरीब व गरजु रुग्णांची सेवा व्हावी हा जनहिताचा सामाजीक दृष्टीकोण ठेवुन मोफत रुग्णसेवा देणाऱ्या सुंदर अशा, रुग्णवाहीकेचा लोकार्पण सोहळा अनिल छबीलदास चौधरी यांच्या हस्ते पार पडला , अनिल चौधरी यांच्या हस्ते प्रथम रुग्णालयातील रूग्णांना फळवाटप करण्यात आलीत तसेच मोफत सेवा देणाऱ्या रुग्णवाहीकेचे पुजन करून करण्यात आले , या प्रसंगी कार्यक्रमास अनिल चौधरी यांच्यावर प्रेम करणारे त्यांची तरूण व युवा मित्रमंडळी या प्रसंगी उपस्थित होती.

यात नगरसेवक अभिमन्यु चौधरी , माजी नगरसेवक तुकाराम बारी , करीम मन्यार , हाजी राजु शेख , हाजी हकिम खाटीक , अमोल देशमुख , राहुल दाऊ , संजय आवटे , हाजी अताउल्ला खान, निलेश बारी , सागर चौधरी , छोटु शेखर तडवी , राहुल कचरे , नरेन्द्र खन्ना , बबलु खाटीक, मजहर मुक्का पहेलवान , दानिष पटेल, तन्वीर मन्यार, निजाम खान , तौसीफ रहेमान, सैय्यद ईमरान, आरीफ शेख आदी कार्यकर्ते व विविध सामाजीक क्षेत्रातील पदाधिकारी याप्रसंगी उपास्थित होते . यावेळी एका रुग्णसेवेशी निगडीत अशा कार्यक्रमास उपस्थित राहील्या बद्दल अनिल चौधरी यांनी आभार मानले .

Exit mobile version