Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथे आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रखुमाईची आरास

पाचोरा प्रतिनिधी । जारगाव ता. पाचोरा येथील राधानगरी मित्र मंडळ तर्फे आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळी विठ्ठल रुखमाई यांची नामाच्या गजरात आरास काढण्यात आली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आरास काढण्यात आली. त्यानंतर नगरीच्या प्रवेशद्वार जवळ विठ्ठल रुखमाई यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले.  यावेळी उपवासाचा फराळ म्हणून साबुदाणा वाटप करण्यात आला. यावेळी रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. 

याप्रसंगी सरपंच सुनिल पाटील, भूषण पाटील, अक्षय पाटील, सुनील पाटील, भूषण जोंधळे, दिपक शेजवळ, दिपक पाटील, दिपक कंखरे, बबलु जाधव, भुषण बैसाने, कुणाल महाले, दीपक राजपूत, सुरज पाटील, समाधान निकम, दिपक तायडे, मित्रमंडळ यांनी कार्यक्रम यशस्वी साठी परिश्रम घेतले.

 

 

 

 

Exit mobile version