Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अग्रवालांनी घरातून संस्था चालविल्यामुळे सोसायटीचे अध:पतन

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | चाळीसगाव एज्युकेशन  सोसायटीची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत परिवर्तन पॅनल उतरले असून पॅनलतर्फे नारायणदास अग्रवाल यांच्या घराणेशाही विरोधात पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रकात संस्थेच्या  अध:पतन सर्वस्वीपणे नारायणदास अग्रवाल यांना दोषी ठरविण्यात आले आहे.

 

परिवर्तन पॅनलचे डॉ. विनोद कोतकर यांनी पत्रकार परिषेदत नारायणदास अग्रवाल यांना त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळाच्या कामगिरीवर निवडून येवून दाखविण्याचे आवाहन केले आहे. परिवर्तन पॅनलने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रात  आरोप करण्यात आला आहे की, नारायणदास अग्रवाल यांनी घराणेशाहीला, संस्थेपेक्षा मोठे केल्यामुळे संस्थेची आजची अवस्था तालुकावासीयांना बघावी लागत आहे. चा. ए. संस्थेचे सत्ताकेंद्र हे अग्रवाल कुटूंबीयांभोवतीच राहिले पाहिजे, हा त्यांचा अट्टाहास संस्थेला  दिवसेंदिवस रसातळाला नेत आहे. आपल्याच घरातील विविध ट्रस्टचे / कंपनीचे नारायणभाऊंनी सिनीयर पेट्रन, पेट्रन, व्हाईस पेट्रन या कॅटेगिरीत सभासदत्व केले आहे. शिवाय चाळीसगाव तालुक्याबाहेरील नातेवाईकांना ज्यांचा दूरपर्यंतचाळीसगावशी अथवा संस्थेशी संबंध नाही, अशांना संस्थेचे सभासद बनवून घेतले आहे. त्यामुळे ते संस्थेला चिटकून बसलेले आहे.

भाऊ इथेच थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची विश्वस्तपदावर नियुक्ती केली आहे. हे दोनही जण धुळे आणि पुणे येथे त्यांच्या स्वतःच्या उद्योगव्यवसायात इतके व्यस्त असतात की, त्यांना संस्थेच्या विविध विभागांना भेट द्यायला वेळ नाही आणि विश्वस्तमंडळाच्या होणाऱ्या सभांना उपस्थित राहणे, त्यांना शक्य नाही. आजपर्यंत विश्वस्तमंडळाने संस्थेच्या सर्व विभागांना भेटी दिल्या असता, या दोघांपैकी एकही जण उपस्थित राहू शकला नाही. पण नारायणभाऊंनी पुत्रप्रेमामुळे संस्थेसाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्या इतर सभासदांना डावलून या दोघांची नियुक्ती केली आहे. त्यापैकी सुशिलभाऊ अग्रवाल यांनी विश्वस्तपदाचा राजीनामादेखील दिला असून नारायणदास अग्रवाल यांनी तो स्विकारलेला नाही. भाऊंचे हे कुटूंबप्रेम / घराणेशाही थांबविण्यासाठी सभासदांनी पुढे येणे काळाची गरज आहे. आपण संस्थेत केलेल्या विकास कामांवर खरोखर विश्वास असेल तर नारायणदास अग्रवालांनी ही निवडणूक पैश्याचे कुठलेही प्रलोभन न देता जिंकून दाखवावी, असे आमच्या परिवर्तन पॅनलच्या वतीने त्यांना जाहिर आवाहन !

 

आम्ही हे करणार 

प्रत्येक सभासदाला वैयक्तीकरित्या सभेचा अजेंडा मिळावा, यासाठी सभासद यादी पत्त्यांसह अद्ययावत करणार.

संस्थेच्या विविध विभागातील विद्यार्थी संख्या वाढावी, यासाठी स्वत:च्या स्कूलबस सुरु करणार.

अध्यापन, अध्ययन आणि संशोधन या त्रिसूत्रीवर आधारीत गुणवत्तापूर्ण शिक्षण देवून, संस्थेचे गतवैभव पुन्हा मिळविणार.

शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षक गौरव दिन साजरा करणार.

आम्ही हे करणार नाही 

शिक्षक/प्राध्यापक भरतीतून लाखो रुपये कमवणार नाही.

स्वत:च्या वाढदिवसासाठी कर्मचाऱ्यांना वेठीस धारणार नाही.

कर्मचाऱ्यांना घरी बोलावून त्यांना संस्थेच्या शालेय कामकाजापासून दूर ठेवून.

Exit mobile version