Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ओला दुष्काळ जाहीर करा – आ.पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा -भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. खरीप हंगाम पुर्णपणे वाया गेला आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून सप्टेंबर – २०१९ मधे पश्चिम महाराष्ट्रासाठी देण्यात आलेल्या एन. आर. एफ. मदतीच्या निकषाच्या तिन पट मदत द्यावी, अशी मागणी आ.किशोर पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन केली. त्यांनी याबाबत सकारात्मकता दाखविल्याचे आमदार किशोर पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

गेल्या महीन्यात पाचोरा – भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने खरीप हंगाम पुर्णपणे उध्वस्त झाला आहे. कापुस, मका, सोयाबीन, मुंग, उडीद सर्व पिक पाण्यात बुडाली आहे. त्यामुळे शेतकर्याना खरीप हंगामातुन खर्च ही निघण्यासारखी परीस्थीती नाही. याबाबत आमदार किशोर पाटील यांनी फेसबुक लाईव्ह वरून शेतकऱ्यांशी संवाद साधुन शेतकऱ्यांच्या समस्येवर चर्चा करून त्यांना आश्वास्थ करत मुख्यमंत्र्यांना भेटून दोन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करत मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली होती. त्या पार्श्वभूमीवर नुकतीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मुबंईत भेट घेऊन शेतकऱ्यांची कैफीयत त्याच्यांकडे मांडली.

दोन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून दिलासा देण्यासाठी आणि रब्बी पेरणीसाठी तात्काळ भरीव मदत देण्याची मागणी केली. शासनाने सप्टेंबर –  २०१९ ला पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यासाठी खास बाब म्हणुन एन.आर.एफ. च्या निकषाच्या तिन पट मतद दिली होती. त्याच धर्तीवर पाचोरा – भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी मदत द्यावी अशी मागणी त्यांनी निवेदनाव्दारे मुख्यमंत्र्याकडे केली. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले. याशिवाय आमदार किशोर पाटील यांनी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांचीही भेट घेतली. त्यांच्याकडे त्यांनी ओला दुष्काळाची आणि भरीव मदतीची मागणी केली.

विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याबाबत आग्रही भुमिका मांडली. याशिवाय त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील, पाचोरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजय गोहील, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते. दरम्यान आमदार किशोर पाटील हे राज्याच्या मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची ही भेट घेऊन निवेदन देणार आहेत.

Exit mobile version