Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विचार विनिमय करून शिवसेनेला पाठींब्याबाबत निर्णय : आघाडीचे मत

Congress NCP

मुंबई, वृत्तसंस्था | महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे, शिवसेनेने काल आम्हाला पहिल्यांदाच पाठिंबा मिळण्यासंदर्भात अधिकृत संपर्क साधला आहे. त्यावर आम्ही दोन्ही पक्ष विचार करुन योग्य तो निर्णय घेऊ, असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज (दि.१२) सायंकाळी काँग्रेस सोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हटले आहे. तर भाजपा सरकार हे मनमानी करणारं सरकार आहे अशी टीका अहमद पटेल यांनी यावेळी केली.

 

राज्यपालांनी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले मात्र काँग्रेसला दिले नाही, यावरही अहमद पटेल यांनी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी काल पहिल्यांदाच सोनिया गांधी यांना फोन करुन सत्तास्थापनेसाठी पाठिंबा मागितला. पाठिंब्यासंदर्भात आज आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. शरद पवार यांच्याशी आम्ही बोललो. आता याबाबत काय तो निर्णय घेऊ असे अहमद पटेल यांनी स्पष्ट केले. काल पहिल्यांदाच उद्धव ठाकरे माझ्याशी बोलले असे शरद पवार यांनीही यावेळी म्हटले. काही मुद्दे आमच्यातच स्पष्ट व्हायचे आहेत, ते झाले की आम्ही शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत निर्णय घेऊ असेही अहमद पटेल यांनी आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Exit mobile version