Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्याच्या मुख्य सचिवपदी देबाशिष चक्रवर्ती

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव केंद्रानं स्वीकारला नाही. त्यामुळे सीताराम कुंटे राज्याच्या मुख्य सचिव पदावरुन आज निवृत्त झाले. कुंटे यांच्या जागी आता नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार स्वीकारला आहे.

सीताराम कुंटे यांना तीन महिने मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे सादर केला होता. मात्र, केंद्राकडून राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जात आहे. संध्याकाळपर्यंत राज्य सरकारचा प्रस्ताव मंजूर करण्यात न आल्यानं अखेर कुंटे यांना निवृत्त व्हावं लागलं आहे. त्यामुळे राज्य सरकारला नव्या मुख्य सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सीताराम कुंटे हे १९८५ च्या महाराष्ट्र बॅचचे अधिकारी आहेत. कुंटे हे मार्च २०२१ पासून राज्याच्या मुख्य सचिवपदी होते. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात त्यांनी चांगलं काम केलं. तसंच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अधिकारी मानले जात होते. तसंच कुंटे यांची काम करण्याची पद्धत आणि सरकारमधील मंत्र्यांसोबतचे चांगले संबंध त्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता. मात्र, केंद्र सरकारकडून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीताराम कुंटे यांच्यावरील विश्वास पुन्हा एकदा दिसून आलाय. कारण, मुख्य सचिव पदावरून निवृत्त झालेले कुंटे यांचा प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार या पदावर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील निर्देश आज दिले आहेत.

Exit mobile version