Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विष घेतलेल्या तरूणाचा मृत्यू

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सदाशिव नगरात राहणाऱ्या 36 वर्षीय तरुणाने कौटुंबिक वादातून विषारी औषध घेतले होते. रात्री सव्वा बारा वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भूषण शालिग्राम पाटील (वय-36) रा. शेळगाव ता. जि. जळगाव ह. मु. सदाशिव नगर जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भूषण पाटील हा पत्नी हर्षा व दोन मुलांसोबत वास्तव्याला होता. वेल्डिंगचे काम करून आपला उदरनिर्वाह चालवत होता. दरम्यान बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घरात झालेल्या कौटुंबिक वादातून त्याने सेल्फॉक्स नावाचे विषारी औषध घेतले. त्याची प्रकृती खालावल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या संदर्भात शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. मयताच्या पश्चात पत्नी हर्षा, मुलगा ओम आणि साई असे नावे आहेत. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय मराठे करीत आहे.

Exit mobile version