Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विषबाधा झालेल्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथील ६६ वर्षीय वृध्दाला विषबाधा झाल्यामुळे आठवडाभर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा सुरू असतांना ३ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी शनिवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रमेश धोंडू नारखेडे (६६, रा. भादली बुद्रुक, ता. जळगाव) असे मृत वृध्दाचे नाव आहे.

 

या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रमेश नारखेडे हे आपल्या परिवारासह जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक गावात वास्तव्याला होता.  २७ जुलै रोजी काही तरी विषारी द्रव्य सेवन केल्याने अथवा फवारणी करीत असताना ते नाकातोंडात गेल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना ३ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यावरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. ही नोंद नशिराबाद पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली. पुढील तपास सहायक फौजदार अलियार खान हे करीत आहेत.

Exit mobile version