Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विष घेतल्याने परप्रांतीय तरूणाचा मृत्यू; नातेवाईकांचा आक्रोश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील आर्वे शिवारातील शेतात ३२ वर्षीय परप्रांतीय शेतातील विषारी औषध घेतल्याने जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान २२ जून रोजी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुनील सुखरिया बारेला वय-३२, रा. कोठा खुर्द ता. खरगोन मध्य प्रदेश असे मयत झालेल्या परप्रांतीय तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील बारेला हा तरुण आपल्या परिवारासह पाचोरा तालुक्यातील आर्वे शिवारात वास्तव्याला होता. गणेश भावसार यांच्या शेतात काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान त्याने शनिवारी २२ जून रोजी पहाटे ५.३० वाजता पिक फवारणीचे विषारी औषध सेवन केले. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. त्याला तातडीने जळगाव जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू असताना सायंकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई-वडील पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

Exit mobile version