Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विजेचा धक्का लागल्याने बैलाचा मृत्यू; भादली बुद्रुक येथील घटना

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भादली बुद्रुक येथील शेतकरी शेतात वखरणीचे काम करत असतांना विद्यूत खंब्याच्या तारेला बैलाचा स्पर्श झाल्याचे विजेचा धक्का लागून बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी नाशिराबाद पोलीसात घटनेची नोंद घेण्यात आली.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील भादली बुद्रुक येथील शेतकरी आनंदा रामू कोल्हे हे आपल्या शेतात दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेतात वखरणी करत असतांना शेतातील विद्यूत खंब्याला स्पर्श झाल्याने बैलाला विजेचा जोरदार धक्का लागला. यात एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलीसांना कळविल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. नशिराबाद पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन कापडणीस यांच्या उपस्थितीत पोलीस नाईक किरण बाविस्कर, डॉ. शिंदे आणि पोहेकॉ प्रविण ढाके यांनी पंचनामा केला.

Exit mobile version